IIश्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थII
आवाहन
ज्ञान प्रचाराच्या कार्याची व्याप्ती बरीच मोठी आहे. एकट्याच्याने किंवा छोट्या समुदायाद्वारे होण्यातले कार्य नाही.आपण आपलेच कार्य आहे असे समजून या कार्यास सेवाभावाने सहकार्य करून उपकृत करावे. पुढाकार घेऊन सहाय्यभूत व्हावे अशी नम्र प्रार्थना आहे. तसे आवाहन आहे. खाली नमूद केलेल्या पैकी कुठल्याही प्रकारे साहाय्य करू शकता
मूळ ध्वनीमुद्रण ऐकून जसे च्या तसे हिंदी भाषेत लिहून काढणे अथवा कॉम्प्यूटरचा वापर करून वर्ड फाईलच्या स्वरूपात परिवर्तीत करणे अथवा व्हिडीओ प्रेझेन्टेशन तयार करणे.
- प्रसंगाध्ययन या सदरासाठी प्रत्यक्ष अथवा काल्पनिक जीवन प्रसंगांचे तपशील अध्ययनासाठी पाठवणे
- अध्यात्म या विषयाशी संबंधित आपले विचार मोकळे पणे कळवणे. त्यायोगे या विषया संबंधी, आचरणात आणण्यासंबंधी, समस्यांवर चर्चा घडून सर्वांनाच त्यापासून लाभ होईल. त्यासाठीच वेब साईट वर ब्लॉगपेज आहेच.
- आपल्या परिचितांना स्वमिज्ञानप्रकाश बद्दल माहिती देऊन आमच्या वतीने त्यांना वेबसाईटला भेट देण्याची विनंती करणे. तसेच सूचना या सदरात आपला उल्लेख आवर्जून करण्यास सांगणे
- आपणास अन्य कुठल्याही प्रकारे साहाय्य करण्याचा विचार सुचल्यास, त्याप्रमाणे संपर्क जरूर करावा. आपण विचारपूवर्वक आपण मार्ग काढूच.
- आपणास अर्थसहाय्य करण्याची इच्छा झाली तर येथे क्लीक करा. अर्थसहाय्य
- आपल्या परीने ही वेबसाईट अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी, तसेच वेबसाईटची व्याप्ती वाढवण्यासाठी, विना संकोच सूचना द्याव्यात. आम्हाला आवडेलच.
- वेबसाईटच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने मदत करणे शक्य असल्यास जरूर कळवावे.
सर्वात महत्वाचे:: कार्य यशस्वी करण्यात सहकार्य
आपण स्वतः ह्या ज्ञानसागाराचा अभ्यास करून ज्ञान, आचरणात उतरवण्याचा प्रयत्न जरूर करावा. आपलाच फायदाच होईल. काही शंका अथवा अडथळे येत असल्यास किंवा काही सिद्धांत संबंधी आणखी स्पष्टीकरण जरूर वाटल्यास मनमोकळेपणे संकोच न करता संपर्क करावा. आपले शंका समाधान करण्याचे प्रयत्न नक्कीच करू. आपल्या यशातच आमचे यश आहे. आपण ज्ञान सागराचा मोकळेपणाने लाभ घेतल्यास सुरु केलेल्या कार्याचा सदुपयोग झाल्याचा अत्यानंद आम्हाला प्राप्त होईल.
विना संकोच स्वतः लाभ घेत इतर परिचितांनासुद्धा प्रवृत्त करावे