स्वामी विश्व संदेश

!!श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ!!

श्री स्वामी विश्वसंदेश

एक सांस्कृतिक चळवळ

शुभारंभ

मनुष्य संस्कृतीचे पुनरुत्थान घडून यावे या उद्देशाने प.पू. लाठकरकाकांच्या पुढाकाराने श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक संषोधन केन्द्रातर्फे श्री स्वामी विश्वसंदेश एक सांस्कृतिक चळवळ  या नावाने त्रैमासिक सुरु करण्याचा संकल्प झाला. प्रथम अंक, दीपावली विशेषांक, ऑक्टोबर 2013 मध्ये प्रकाशित झाला. अलिकडेच त्रैमासिकाच्या दुसर्‍या वर्षातील दुसर्‍या अंकाचे प्रकाशन अक्षय तृतीया (एप्रिल 2015) या शुभदिनी करण्यात आले.  

संकल्पना

श्री स्वामी समर्थ प्रबोधनानुसार, मनुष्य संस्कृतीच्या पुनरुत्थाना साठी (मानवता प्रस्थापित करण्यासाठी) प्रत्येक व्यक्तीने अध्यात्म ज्ञानधिष्ठित आचरण तसेच सदाचार प्रस्थापित करणे गरजेचे आहे.समाजातील बहुतांशी व्यक्तींची वागणूक सुधारल्या खेरीज समाज प्रगतीपथावर येणार नाही. असंख्य स्वामी भक्त स्वतःची वागणूक स्वामी समर्थांच्या उपदेशानुसार सुधारण्याचा प्रयत्न कसोशीने करीत आहेत. परंतु अजून बर्‍याच जणांनी हे प्रयत्न करणे जरुरी आहे.

सदाचार अथवा अध्यात्म ज्ञानावर आधारित आचरण करणार्‍या व्यक्तींची संख्या जशी जशी वाढत जाईल तसा तसा मानव समाज हळू हळू समंजस, एकोप्याने राहाणारा, सुसंकृत होईल. आपोआप प्रगती पथावर जाईल. आंतर्गत अनावष्यक संघर्षांचे प्रमाण कमी कमी होऊ लागेल. अनावष्यक हव्यास कमी होईल.

त्यासाठीं सुयोग्य ज्ञान श्री स्वामी समर्थ स्वत: प्रबोधित करीत आहेत. हे श्री स्वामी समर्थ प्रबोधित ज्ञान समाजातील सर्व स्तरातील प्रत्येक व्यक्ती पर्यंत पोहोचणे अत्यावष्यक ठरते. तोच प्राथमिक उद्देश दृष्टिपथात ठेऊन  श्री स्वामी विश्वसंदेश एक सास्कृतिक चळवळ   हे त्रैमासिक सुरु करण्याचा निर्णय झाला.

ह्या त्रैमासिकाचा लाभ सर्वांनी घ्यावा. तसेच त्रैमासिकातील विवध लेखांत मांडलेल्या ज्ञानविचारांवर साकल्याने स्वत: विचार करून स्वत:चे आचरण स्वत:ची वागणूक सुधारण्याचा अटोकाट प्रयत्न करावा. अशी कळकळीची विनम्र विनंती आहे.

प्रस्तुत स्वामीज्ञानप्रकाश या संकेत स्थळावरून त्रैमासिकाच्या प्रत्येक अंकाची कॉम्पूटरद्वारे वाचता येणारी प्रत विनाशुल्क उपलब्ध करून देत आहोत. एप्रिल-मे-जून  2015 हा दुसर्‍या वर्षाचा दुसरा अंक आत्ता उपलब्ध करून दिला आहे. पुढील अंक प्रकाशित होताच, उपलब्ध होतीलच. परंतु मागील अंक सुध्दां थोड्याच दिवसांत उपलब्ध करून दिले जातील.

डाऊनलोड करण्यापूर्वी आपले संपूर्ण नाव; आपला ईमेल पत्ता नोदवावा. 

सभासद नोंदणी

 आपण वर्गणिदार झाल्यास आपणांस भारतात कुठेही छापील प्रत घरपोच पाठवली जाईेल.

वार्षिक वर्गणी  रु. 250/-  फक्त

वर्गणी संस्थेच्या बँक अकाऊंटवर भरावी. अथवा चेकने पैसे पाठवावेत. अथवा रोखीने संस्थेच्या कार्यालयात औरंगाबाद येथे भरावेत.

पैसे पाठवल्यावर संस्थेच्या पत्यावर पत्राद्वारे अथवा ईमेल द्वारे आपले संपूर्ण नाव,आपला संपूर्ण पत्ता, आणि पैसे भरल्याचा तपशील कळवावा.

बँक अकाऊंट तपशील

यूनियन बँक ऑफ इंडिया, उस्मानपुरा शाखा, औरंगाबाद.

खाते क्र. : 493802010083693

IFC Code: UBIN0549380

खात्याचे नांव: श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक संशोधन संस्था

क्रॉस्ड चेक श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक संशोधन संस्था” या नांवे काढावा

संस्थेचा पत्ता

श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक संशोधन संस्था
स्वामी निवास
103- कालिंदी-क दिशा नगरी,
बीड बायपास रोड, औरंगाबाद 431010.

e-mail id: sblathkar@gmail.com

Scroll to Top