II श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ II
सुस्वागतम्
स्वामी समर्थ प्रबोधित अध्यात्म ज्ञान-भांडारात आपलं मन:पूर्वक स्वागत
प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थांच्या आवाजात प्रबोधनाचा उद्देश तसेच ह्या ज्ञानविचारांचे महत्व विशद करणारा संदेश
ध्येय
अध्यात्म सिध्दांतासंबंधी सर्वांगीण माहिती सर्व जिज्ञासू व्यक्तींना मनमोकळेपणे, निस्वार्थपणे वाटणे.
पार्श्वभूमी
अक्कलकोटनिवासी स्वामी समर्थ महाराजांनी १३५ वर्षापूर्वी देह विसर्जित केला. तेव्हांपासून ते भक्तांना धीर देत त्यांच्या प्रापंचिक अडचणी सोडवण्यास प्रेमाने मदत करीत आहेतच. परंतु त्याच बरोबर त्यांना असंख्य भक्तांच्या सर्वांगीण उन्नतीची जास्त कळकळ वाटते. आता त्यांना देहाचं बंधन नसल्याने ते अनेक उन्नत भक्तांच्या माध्यमातून स्वत: कार्य करतात. प्रस्तुत समयीं श्री स्वामी समर्थ औरंगाबाद शहरात रहाणार्या परमपूज्य श्री. शरद बळवंत लाठकर नामक सत्पुरुषांच्या वाणीतून रोज ठराविक वेळेस प्रवचन करतात. एकही दिवस खंड नाही. एक ही दिवस सुट्टी नाही. ह्या प्रवचन सत्राला स्वामींनी ” संचार प्रबोधने “असे नांव दिले आहे. हे दिव्य ज्ञानसत्र इ.स. १९८८ मध्ये सुरू झाले. इ.स. २००५ पासून ही प्रवचने ध्वनिमुद्रित करण्यास सुरुवात झाली. आज असंख्य संचार प्रबोधने भक्तांना ऐकण्यासाठी, तसेच अभ्यासासाठी ध्वनिमुद्रित स्वरूपात उपलब्ध आहेत. मी कांही मोजक्याच विषयांवरील प्रबोधनांचा अभ्यास केला. मला प्रबोधनांतील विचारांची स्पष्टता जाणवली आणि आवडली. संभ्रमाला थाराच नाही. अनेक सिध्दांतांचे गूढ अर्थ, अनेक तत्वरहस्ये स्पष्टपणे उलगडून समजावली आहेत. मला स्वत:ला श्री स्वामी समर्थांची खोलात शिरून समजावण्याची पद्धत फारच आवडली. ऐवढं मोठ्ठं घबाड हाती लागल्याचा अत्यानंद झाला. त्याच बरोबर ह्या सगळ्या ज्ञानभांडाराचा अभ्यास करण्याची उत्कट इच्छा निर्माण झाली. ऊर्वरित आयुष्य ह्या अभ्यासा साठी तसेच स्वामीसेवेसाठी वेचण्याचा निश्चय केला. हे ज्ञानभंडार सर्व जिज्ञासूंसाठी खुले करण्याचे ठरवले. श्री स्वामी समर्थांनी सुध्दा खुल्या दिलाने आशिर्वाद दिला. तसेच ह्या ज्ञानभांडाराचा सर्व जगतात प्रचार करण्याची आज्ञा केली.
संकल्पना
प्रस्तुत वेबसाईटच्या स्वरूपांत हे पहिले पाऊल टाकले आहे. आपण ह्या खुल्या ज्ञानभांडाराचा विनासंकोच मुक्तपणे पुरेपूर लाभ घ्यावा अशी नम्र विनंती आहे. इच्छा होईल तेवढं ज्ञान लुटा. खजिना उघडाच आहे. फ्री आहे. ज्ञानाचा वापर दैनंदिन जीवनात केल्यास मन:शांती, समाधान, चिंतामुक्ती या स्वरूपांत लाभ नक्कीच मिळेल. लाभ, वापर केल्यासच मिळेल अन्यथा नाही. हे लक्षांत घ्यावे. ज्ञान वापर करताना मदत लागल्यास संकोच न करतां, संपर्क करावा अशी आपणास विनंती आहे.
आवाहन
आपले सहकार्य महत्वपूर्ण आहे. आपण खुल्या दिलाने प्रचारकार्यास हातभार लावावा अशी नम्र प्रार्थना आहे. आपले आप्तस्वकीय स्नेही ओळखीचे इत्यादी जिज्ञासू व्यक्तींना या वेबसाईट बद्दल माहिती देऊन उपकृत करावे तसेच आपण सभासद व्हावे ही विनंती. सभासद होणे नि:शुल्क आहे. त्यायोगे आपणाबरोबर वार्तापत्रकाद्वारे संवाद साधणे शक्य होईल.
सभासद नोंदणी
आपला संदेश मिळाल्याची पोच ई-मेल द्वारा आपल्याला ताबडतोब मिळेल. सभासद नोंदणी झाल्याचा ई-मेल आपल्याला लवकरच व्यक्तिशः पाठवला जाईल.
माझ्याबद्दल आणखी माहिती प्रकाश कृ काळे
प्रेरणा स्थान परमपूज्य श्री शरद लाठकर यांच्या बद्दल आणखी माहिती लाठकरकाका
कृपया आपल्या सूचना, आपले विचार, आपली मते येथे नोंदवावीत अशी विनंती आहे. सूचना
आपला अमूल्य वेळ खर्चकरून वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुढील भेटीची प्रतीक्षा आहे.
कळावे लोभ असावा हे विनंती.
प्रकाश कृ. काळे
स्वामीज्ञानप्रकाश