प्रेरणा

|| श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ||

प्रेरणा स्थान​

श्री शरद बळवंत लाठकर
 

जन्म: ०८ नोव्हेंबर १९४९

शैक्षणिक पदवी: केमिकल इंजिनियर यु. डी. सी. टी. मुंबई

व्यावसायिकअनुभवः  (नोकरी)  १९७४ ते १९९२.

 संशोधनक्षेत्रातकार्यः  पेन्टस, प्रिंटिंग इंक्स, ल्युब्रिकन्टस,अ‍ॅडीझीव्हस तसेच एक्सपलोझिव्हस्

उद्योजकः    वाळूंज एम. आय. डी. सी., औरंगाबाद येथे स्वतःचा केमिकल्स बनवण्याचा कारखाना

अध्यात्मिकक्षेत्रातः    १९८२ ते १९८८ या कालावधीत सद्गुरू दत्तप्रभू श्रीनृसिंहसरस्वती महाराजांच्या कृपाछत्रा खाली साधना तसेच दिव्य अतींद्रिय अनुभव. त्याच काळांत उच्च ध्यानावस्थेत प्रबोधनात्मक विचार लिखित स्वरूपांत प्रसृत होऊ लागले.

१९८८ मधे अक्कलकोटला दर्शनासाठी गेले असतां, दिव्य अनुभव प्राप्त झाला. श्री नृसिंहसरस्वती महाराजांनी त्यांना श्री स्वामी समर्थांच्या हवाली केले. स्वामीभूतअवस्थेचा, एकरूपतेचा अनुभव सिध्द झाला. त्यानंतर उच्च ध्यानावस्थेत श्री स्वामी समर्थ त्यांच्या वाणीतून प्रबोधन करूं लागले. सुरुवातीला प्रवचनाची वेळ निश्चित नव्हती. कालांतराने प्रवचनाची वेळ निश्चित झाली. ऑक्टोबर २००५ पासून ध्वनिमुद्रणाची सोय झाली. प्रवचनाचे ध्वनिमुद्रण नियमीत होऊ लागले. तेव्हांपासून सुरू झालेला हा उपक्रम आज सुध्दां चालूच आहे. एकही दिवस खंड नाही. एकही दिवस सुट्टी नाही. अविरत अखंड प्रवचनसत्र चालूच आहे. श्री स्वामी समर्थांनी स्वतःच ह्या प्रवचनसत्राला “संचार प्रबोधने ” असे नांव दिले. श्री स्वामी समर्थ भक्तांच्या कल्याणासाठी असंख्य तत्वरहस्ये, वेगवेगळ्या पातळीवर प्रगतीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर घडणार्‍या घटनांचे सविस्तर स्पष्टीकरण उलगडून सांगतात. उद्देश केवळ भक्तांचे कल्याण, पथभ्रष्टसाधकांना त्यांच्या चुका दाखवून देत मार्गदर्शन करीत परत योग्यमार्गावर आणणे, तसेच उच्चपातळी गाठूशकणाऱ्या भक्तांचा विकास.

 परम पूज्य श्री लाठकरकाका सदासर्वदा स्वामींच्या अनुसंधानात व्यग्रअसूनसुध्दां सन्मुख येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती बरोबर सुखसंवाद साधत त्याला सुयोग्य मार्गदर्शन करतात. हीच त्यांची विशेषता आहे. हेच त्यांचे कार्य अविरत चालू आहे.

अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।श्री स्वामी समर्थ महाराज की जय।

Scroll to Top