साहित्य

 IIश्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थII

पुस्तके

 १) स्वामी संदेश (पुष्प – १)                  Buy Now

खरेदीसाठी आपल्याला पुस्तकांच्या अ‍ॉनलाईन दुकानाच्या वेबसाईटवर नेले जाईल. आपण ई-बुक किंवा हार्ड कॉपी पाहिजे ते विकत घेऊ शकता. 

अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराजांनी, समग्र भक्तांच्या उद्धारासाठी, आजच्या काळात प्रत्यक्ष प्रबोधनांच्या माध्यमातून दिलेला दिव्य संदेश.

प.पू. लाठकरकाकांच्या वाणीतून आविष्कृत झालेला हा परमार्थ बोध, श्री. प्रकाश कृष्णाजी काळे यांनी श्री स्वामी समर्थांच्या आदेशानुसार, मुद्देसूदरित्या अत्यंत सोप्या भाषेत पुस्तकरूपांत सादर केले आहे.

Swami Sandesh

अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांनी  प्रबोधित केलेले ज्ञान विचार संकलित करून आजच्या प्रचलित वस्तुनिष्ठ विचारप्रणालीच्या अनुषंगाने सहजसुलभ सोप्या भाषेत मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न श्री. प्रकाश कृ. काळे यांनी केला आहे.  संबंधित वास्तवाचे परखड विवेचन लेखकाने सादर केले आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात उपयुक्त असलेले, आचरणांत आणण्यासारखे ज्ञानविचार श्री स्वामी समर्थांनी भक्तांच्या समोर विचारार्थ मांडले आहेत.

प्रस्तुत समाजिक परिस्थितीत सदाचार प्रस्थापित होणे नितांत गरजेचे आहे. ज्ञान ग्रहण केल्या शिवाय सदाचार प्रस्थापित करणे असंभव. लेखकाचा उद्देश केवळ श्री स्वामी समर्थांनी सांगितलेले ज्ञान समग्र भक्तांपर्यंत पोहोंचविणे हाच आहे. याच हेतूने अनेक सूक्ष्म संकल्पना आणि सिद्धांतांचा उलगडा प्रस्तुत पुस्तकात केला आहे.

 

पुस्तकात समजावलेले, दैनंदिन जीवनाशी निगडित विषय
मनुष्य जन्माची दुर्लभतामनुष्यजन्माचे प्रयोजन
अंतःकरणाची कार्यपद्धतीमनुष्य शरीरांतर्गत घडणार्‍या अतिप्रगत तांत्रिक प्रक्रिया
चित्रगुप्ताच्या नोंदीपापपुण्याचा हिशेब
कर्मबंधन (एक जळजळीत वास्तव)नशीब अथवा प्रारब्ध (वास्तव आणि कार्यपद्धती)
जन्म-मृत्यूचे चक्र (वास्तव आणि कार्य)शरीराचा ऊर्जा स्त्रोत, ऊर्जापुरवठा व वितरण प्रणाली
दैनंदिन जीवन आणि अद्यात्म यांचा परस्पर संबंधदैनंदिन जीवनात कर्मयोगाचा प्रयोग / उपयोग
अन्न संस्कारकाळाचे महत्व
मृत्यूची प्रक्रियामृत्यू पश्चात् जीवाची भ्रमंती

देव कर्ता हे वास्तव

श्री स्वामी समर्थ महाराजांचा हा संदेश म्हणजे त्यांच्या हम गया नही, जिंदा है । या वचनाची साक्ष आहे. प्रस्तुत काळांतील वाचकांची मयार्यादित ग्रहणक्षमता लक्षात घेऊन, महाराजांनी आपले विचार गद्यस्वरूपात अत्यंत सोप्या भाषेत मांडले आहेत, जेणेकरून सर्वसामान्य भक्तालाही त्याचा सहज बोध होईल.  परमार्थातील अनेक तत्वरहस्यांची उकल सुलभ पद्धतीने केली आहे. प्रत्येक सिद्धांताचे स्वामींनी सूक्ष्म पातळीवर केलेले विश्लेषण विलक्षण असून या ज्ञान पर्वणीचा लाभ आपण सर्वांनी करून घ्यावा.

ईश्वराच्या नियंत्रण व्यवस्थेच्या संदर्भात मनुष्याच्या आजच्या अवस्थेचे दाहक वास्तव समजावण्याचा प्रयत्न केला आहे. दाहकतेची तसेच नियंत्रण व्यवस्थेची यथार्थ जाणीव झाल्यावर मनुष्य नक्कीच मुक्तीचा रस्ता शोधण्याचा, पर्यायानेअध्यात्मशास्त्र या विषयात रुची घेऊन, त्याचा अभ्यास करून, स्वतः चिंतनकरून, स्वत:ची उन्नती साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेलच.

प्रत्येक जिज्ञासूने जरूर अभ्यास करण्याजोगे व संग्रही संदर्भाकरिता ठेवावे असे पुस्तक आहे. जरूर वाचा.

  

२) नित्य उपासना – कृती व महत्व               Buy now

खरेदीसाठी आपल्याला पुस्तकांच्या अ‍ॉनलाईन दुकानाच्या वेबसाईटवर नेले जाईल. आपण ई-बुक किंवा हार्ड कॉपी पाहिजे ते विकत घेऊ शकता.

 

श्री स्वामी समर्थ प्रस्तुत समयीं प्रबोधित करीत असलेल्या ज्ञानावर आधारित पुस्तक आहे. नित्य उपासना कर्म या विषयावरील प्रबोधन संचात प्रबोधित केलेले ज्ञानविचारांचा सारांश प्रस्तुत पुस्तकांत सोप्या भाषेत समजावला आहे.
आपल्या धर्मातील वेद वाङ्मय, श्रुतिग्रंथ यांतील शास्त्रानुसार असंख्य नित्यनैमित्तिक कर्मे तसेच  उपासना प्रकार सांगितले आहेत. त्यातील महत्वाची कर्मे आणि  उपासना यांच्यावर आधारित ठराविक क्रिया, दररोज, न चुकता, ठरलेल्या वेळेवर, ठरलेल्या ठिकाणी नियमितपणे का व कशा कराव्या याचे मार्गदर्शन प्रस्तुत पुस्तकात आहे.
nityacover-1
नित्य उपासना कर्म केल्याने स्वतःची स्थिती, स्वतःचे संचित आणि प्रारब्ध, स्वतःचे भविष्य आणि वर्तमान, स्वतःचा पूर्वजन्म याबाबतीत माणसाला संपूर्ण ज्ञान प्राप्त होऊ शकते. त्याचप्रमाणे स्वतःची जीवन पद्धती ठरविण्याची क्षमता त्याच्या अंगी येऊ शकते. अशाप्रकारे त्रिदेह धारण केलेले जीव, संचित व प्रारब्धामुळे ज्या समस्या संकटे येतात त्यातून नक्की वाचण्याचा मार्ग तत्परतेने व हुशारीने काढण्याची हिम्मत दाखवू शकतात. आणि हे सर्व करता येणे हाच नित्य उपासना कर्म करण्याचा उद्देश आहे.
मानवाच्या जीवनातील प्रत्येक स्तरावर प्रत्येक समयी वेगवेगळ्या वेळी शास्त्रानुसार काय विधी करावेत, काय कर्म करावे, काय क्रिया कराव्यात, कुठली उपासना करावी कि ज्यामुळे संचित आणि प्रारब्धाचा प्रभाव कमी होऊन मनुष्याचा पुरुषार्थ वाढीस लागून तो ब्रह्मतत्व, मोक्ष साधन या दिशेने कशी वाटचाल करेल, हे सर्व समजण्यासाठी आणि जीवनातील सत्य काय आहे, ज्ञान कसे प्राप्त होईल, अनंत तत्व म्हणजे काय व ते कसे मिळेल व सर्वात शेवटी जीवनातील गंतव्य स्थान मिळविण्याच्या दृष्टीने नित्य उपासना कर्म फारच आवश्यक आहे. जर विधिवत आचरण होईल, जर बाल्यावास्थेपासूनच शास्त्रानुसार मनुष्याच्या जीवनाची सुरुवात होईल, तर नक्कीच जी काही पापकर्मे केली असतील, जो काही पापांचा साठा केला असेल, स्थूल सूक्ष्म आणि कारण देहात व अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय आनंदमय कोषात अनंत जन्मांमधील संस्कारांमुळे निर्माण झालेली जी काही अपवित्रता होती कि ज्यामुळे पापांचा साठा झाला होता, ज्यामुळे मन बुद्धि चित्त मलिन झाले होते, ज्यामुळे मनुष्याला बंधने जाणवत होती, त्या सर्वांपासून मुक्तता मिळेल. या सर्व गोष्टींपासून मुक्तता मिळविण्यासाठी, पापक्षालन करण्यासाठी, शास्त्रानुसार कार्य करण्याचे संकेत आहेत. विधिवत काय आणि निषिद्ध काय हे ठरविले आहे. विहित कर्म कुठले आणि निषिद्ध कर्म कुठले याचे संकेत आखून दिले आहेत. नित्य उपासना कर्म या मार्गावरून चालणारा मनुष्य आपल्या जीवनातील वाटचालीवर संपूर्ण नियंत्रण ठेवू शकतो.
 
 

३) श्री स्वामी समर्थ प्रकटदिन पोथी               Buy now

खरेदीसाठी आपल्याला पुस्तकांच्या अ‍ॉनलाईन दुकानाच्या वेबसाईटवर नेले जाईल. आपण ई-बुक किंवा हार्ड कॉपी पाहिजे ते विकत घेऊ शकता.

Swami Prakatdin Pothi

 

श्री स्वामी समर्थानी सद्गुरू तत्व चरित्ररहस्या संबंधी सविस्तर वर्णन प्रबोधनाद्वारे केले आहे. त्यावर आधारित पारायणास योग्य ओवीबध्द चरित्र प्रा. डॉ. माधवराव दिक्षित यांनी लिहिले आहे. प्रगटदिनापासून ते पीठापूर  (शके  १०७१ ते  शके १२४२)  पर्यतचा कालखंड या पोथीत वर्णन केला आहे. ह्या कालखंडातील माहिती दुसरीकडे कुठेच मिळत नाही. प्रत्यक्ष स्वामी समथार्थांनीच सांगितल्यामुळे वर्णन खात्रीलायक आहे.

 

४) स्वामी समर्थ गौरव गाथा

Swami Samarth Gourav Gaatha

महावतार श्री स्वामीसमर्थ महाराज अक्कलकोट यांच्या दृष्टांतानुसार त्यांचा ७२९ वर्षांचा प्रदीर्घ जीवनपट उलगडण्याचा प्रयत्न प्रा. श्रीमती नम्रता भट यांनी अव्याहत  २९ वर्षे केला. महाराजांचे प्रकटीकरण, त्यांची आसेतुहिमाचल भ्रमंती, अद्भूद लीला, स्वामी कृपांकित घराणी, प्रासादिक वस्तू, त्यांचे शिष्य-प्रशिष्य-सेवकवर्ग आणि समग्र कार्यावर संशोधन सुरु आहे. श्रीकृपेने आजवर १४५० पृष्ठांचे प्रदीर्घ लेखन घडले असून ‘स्वामी समर्थ गौरव गाथा’ या नावाने ३ बृहद खंड प्रकाशित झाले आहेत. श्रींच्या आज्ञेने आणि कृपेने अथक परीश्रामांती या शोध यात्रेतील हा तिसरा खंड आता सिद्ध झाला आहे. यात शेगावचे गजानन महाराज, शिर्डीचे साईबाबा, धनकवडीचे शंकर महाराज, कोळगाववाले बाबा व अन्य स्वामीकृपांकित विभूतींची चरित्रे तसेच घराणी व त्यांचे कडील प्रासादिक पादुका, गोटी, टोपी, दंड, वस्त्र यांचे सचित्र वर्णन या ग्रंथात प्रथमच प्रकाशित झाली आहेत. अथक प्रयत्न तसेच प्रदीर्घ संषोधनावर आधारित हा ग्रंथांचा संच वाचनीय तसेच संग्रही ठेवण्यालायक आहे.

 

 

 आणखी माहिती तसेच  खरेदीसाठी

आपल्याला प्रकाशन संस्थेच्या वेबसाईटवर नेले जाईल. त्यांच्या कडून आपण खरेदी करू शकता.

 

 

॥  शुभं भवतु। शुभं भवतु। शुभं भवतु ॥
 

 

 
 
 
Scroll to Top