!! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ !!
श्री. प्रकाश कृ. काळे
जन्म: २० जुलै १९४६, डहाणूरोड, महाराष्ट्र, भारत
शैक्षणिक पदवीः बी.ई. मेकॅनिकल
महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटी, बडोदा
विशेष प्रशिक्षणः प्रेस टूल टेक्नॉलॉजी
स्थळः वूपरताल वेस्ट जर्मनी.
व्यावसायिक जबाबदार्याः व्हिकर्स स्पेरी ऑफ इंडिया लिमिटेड; टूल डिझाईन इन्चार्ज १९७१ ते १९७४
व्होल्टास लिमिटेड; अॅसिस्टंट मॅनेजर (प्रेस टूल डिझाईन); डेप्यूटी मॅनेजर (इक्विपमेंट अॅन्ड टूल्स प्लॅनिंग) एअरकंडीशनिंग अॅन्ड रेफ्रीजरेशन १९७४ ते १९८६.
उद्योजकः १९८६ ते २०११ कंपनीः स्वामी समर्थ कन्सल्टन्टस
कामाचे स्वरूपः- टर्नकीऑटोमेशनप्रॉजेक्टस; डिझाईन, उत्पादनआणि कमिशनिंगसह; आणि स्पेशलपरपज मशिनरी.
कार्यकक्षाः-ऑटोमोटिव्ह प्रकल्पांसाठी अॅसेम्ब्ली मशीन्स, टेस्टिंग वइन्सपेक्शन मशीन्स कार्ब्यूरेटर कंपनीसाठी, ऑटोमॅटिक उघड झाप करणारे मोळे दरवाजे, काचेच्या बाटल्या पॅकिंगसाठी हायस्पीड श्रिकरॅपिंग प्रकल्प, पॅकेजिंग व फिलिंग मशीन्स औषध उद्योगासाठी, इत्यादी.
अध्यात्मक्षेत्रांतः- धार्मिक तसेच अध्यात्मिक मनोवृत्तीच्या कुटुंबात जन्म. आई वडील दोघे अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराजांचे निःसीमभक्त. अध्यात्मासंबंधी आवड तसेच जिज्ञासा लहानपणीच निर्माण झाली. वयाच्या १४ व्या वर्षापासून साधना सुरू झाली. परम पूज्यश्री. लाठकर काकांचा संबंध २००९ पासून प्रस्थापित झाला. श्री स्वामी समर्थांनी प्रबोधित केलेली प्रवचने ऐकून अध्यात्मासंबंधी जिज्ञासा तीव्र झाली. तसेच श्री स्वामी समर्थां बद्दलची श्रध्दा अधिकच बळकट झाली. संचार प्रबोधनांचा अभ्यास तसेच श्री लाठकर काकांबरोबरची संवादात्मक चर्चा तसेच श्री स्वामी समर्थांची दिव्यकृपा यांच्या संयोगाने अध्यात्म क्षेत्रात, अनेक दिव्य अनुभवातून आनंदाची अनुभूती घेण्याची संधी मिळाली. ऊर्वरित आयुष्याचा स्वामी सेवेसाठी तसेच अध्यात्मज्ञानप्रचाराच्या कार्यासाठी विनियोग करण्याचा निर्णय घेतला.
कौटुंबिक जबाबदार्यांतून मोकळीकः ठरवल्या प्रमाणे लगेच व्यवसायाची सूत्रे मुलाकडे सुपूर्द करून त्याला सक्षम होण्यास मदत केली.
शेवटचीउडीः सरतेशेवटी २०११ पासून कौटुंबिक तसेच व्यावसायिक जबाबदार्यांपासून मोकळीक झाली. पूर्णवेळ सर्वशक्तीने केवळ स्वामीकार्य करण्यास सुरुवातझाली. परिणामस्वरूप श्री स्वामी समर्थांच्याकृपेने स्वामी संदेश –पुष्प१ हे पुस्तक २०१३ सालीं प्रसिध्द झाले. मानवी शरीर तसेच परमेश्वरी नियंत्रणयंत्रणा या संबंधी प्राथमिक ज्ञान सोप्या भाषेत समजावण्याचा प्रयत्न केला आहे. मानवी जीवनाचा उद्देश, प्रयोजन, ज्ञानाधिष्ठित आचरण प्रस्थापित करण्याच्या पध्दती, इत्यादी विषयांसंबंधी चर्चा वैयक्तिक पातळीवर तसेच छोट्या समुदायांसोबत करणे आवडते. सामाजिक संस्थांसाठी प्रवचने तसेच व्यावसायिक आस्थापनांसाठी प्रेझेंटेशन्स इत्यादी माध्यमाद्वारे श्री स्वामी समर्थ प्रबोधित करीत असलेले ज्ञान समग्र मानव समाजात प्रचारित करण्याचे कार्यकरीत आहे. श्री स्वामी समर्थांची कृपादृष्टी आहेच. तेव्हां यश मिळणारच अशा विश्वासाने कार्य सुरू आहे.
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय।